Follow us

पालखेड कालवा आधुनिकरणासाठी १३०० कोटीचा प्रस्ताव : शंकरराव वाघ

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, निफाड, येवला, अहमदनगर जिल्हातील कोपरगाव तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर अशा तीन जिल्ह्यांतील पाच तालुक्यातील जवळपास ४२ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणाऱ्या पालखेड डाव्या कालव्यासाठी एस.एल.एम.पी (सिम्प) अंतर्गत ए.डी.बी. च्या सहाय्याने जलसंपदा विभाग तथा पालखेड पाटबंधारे खात्याने पालखेड डाव्या कालव्याच्या आधुनिकीकरणासाठी १२८२.२० कोटी इतक्या रक्कमेचा प्रस्ताव सादर केला आहे. सदर प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर करावा,यासाठी नाशिक जिल्हा ग्रामीण भाजप पक्ष जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ यानी शुक्रवार (दि.२३) नाशिक दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत याकामी लक्ष घालण्याची विनंती केली.

ए.डी.बी.च्या सहाय्याने आधुनिकीकरण नूतनीकरणाकरीता भारतातील चार प्रकल्प निवडले गेले आहे. त्यात पालखेड डाबा तट कालवा व पूर्णा पाटबंधारे प्रकल्प हे महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांपैकी (सिम्प) प्रकल्प अंतर्गत निवडले गेले आहे, पालखेड या तट कालवा प्रकल्पाच्या नुतनीकरण व आधुनिकीकरणाच्या अनुषंगाने सामाजिक आर्थिक प्रगती साधणारे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. पालखेड डावा तट कालवा आधुनिकीकरण हे काम नशिक जिल्हा अंतर्गत दिडोरी, निफाड, येवला या तालुक्यांमधून पुढे जात अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यातून मार्गक्रमण करत पुढे संभाजीनगर जिल्हातील वैजापूर तालुक्यात असे एकूण ४१५८० हेक्टर सिंचन क्षेत्रकारिता प्रस्तावित आहे.

त्यात एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे. या कालव्याच्या लाभक्षेत्रातील मुख्य द्राक्ष हे पिक आहेच, त्याचबरोबर टोमेटो, कांदा,भाजीपाला व ऊस आदी पिकेही या सिंबर लाभक्षेत्रात या पाच तालुक्यातील शेतकरी घेत असतात. सदर कालव्यावर १६० पाणी वापर संस्था कार्यरत आहे. १०० संस्था नवीन कायद्याप्रमाणे प्रस्तावित तर ६० नवीन कायद्यामागे स्थापन करण्यासाठी प्रगतीपथावर कामकाज करत आहे. पालखेड डावा तट कालव्याचे विशेष सल्लागारांमार्फत विविध प्रकारचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. विशेष सल्लागारामार्फत प्रारुप आराखडा तयार करण्यात आला आहे.

प्रारूप आय. एम.पी च्या आधारे १२८२.२० कोटी इतक्या रकमेचा प्रस्ताव तयार करून शासनास पुढील मंजुरी करीता सादर करण्यात आलेला आहे,त्यापैकी ३१.२० कोटी सविस्तर प्रकल्प अहवाल व त्या अनुषंगिक कामे करण्याकरीता प्रस्तावित असताना वित्त व नियोजन विभाग यांच्याकडे बऱ्याच दिवसांपासून सदर फाईल प्रलंबित आहे,त्यास वित्त विभागाची मंजुरी मिळणे आवश्यक आहे, तरी एम. आय.एम.पी. (सिम्प) अंतर्गत ए.डी. बी. च्या साह्याने जलसंपदा विभाग, पालखेड पाटबंधारे खात्याच्या पालखेड डावा कालव्याचे आधुनिकीकरण कामासाठी १२८२.२० कोटी रकमेस राज्य शासनाची मान्यता मिळावी व या भागाला मुबल प्रमाणात पिण्याचे व सिंचनाचे पाणी मिळण्यासाठी शासनाने यात लक्ष द्यावे, यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करत पालखेड डाव्या कालव्याला नवसंजीवनी देण्याची मागणी केली.सदर प्रकल्प पूर्ण झाल्यास तीन जिल्हाना मुंबलक प्रमाणात पिण्याचे पाण्याचे नियोजन करता येणार आहे. तसेच यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढीसाठी मदत होणार आहे. ऊसाचे क्षेत्र देखील वाढून कारखान्यांना सुखीचे दिवस येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED LATEST NEWS

Follow us