Follow us

नववी – दहावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

सालाबादप्रमाणे या हीवर्षी डांग सेवा मंडळ संचलित एकलव्य आश्रमशाळ(उंबरठाण), गिरजादेवी आश्रम शाळा(शिंदे दिगर), पंडित जवाहरलाल नेहरू आश्रमशाळा ( कुकडणे) या तीन आश्रमशाळांमधील कर्मवीर भाऊराव पाटील दत्तक पालक योजना आणि डांग सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नववी – दहावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. डांग सेवा मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा हेमलताताई बिडकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या तर छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष रोहित वाघ , उपाध्यक्ष स्विटी गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी हेमलता ताईंसह प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी मार्गदर्शन देत शुभेच्छा दिल्या.

डांग सेवा मंडळ या संस्थेमार्फत दादासाहेब बिडकर यांनी १९३७ पासून बालवाडी ते पदव्युत्तर विभागांतर्गत शिक्षण देणाऱ्या विविध शाळा आदिवासी व डोंगराळ भागात सुरू करून गोरगरीब मुलांकरिता आर्थिक उन्नती होण्याच्या दृष्टीने आदिवासी, दलित कष्टकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून येणाऱ्या आवाहनांना सामोरे जाण्यासाठी मुलांना सक्षम बनविले त्यांचे कार्य आजही सर्वांसाठी प्रेरणादायक आहे आणि त्यांचा वसा आज ही अविरतपणे गेल्या तीन पिढ्यांपासून केवळ ‘एकच ध्यास,वंचितांचा विकास’ हे व्रत हाती घेऊन आदिवासी भागात अहोरात्र काम आज दादासाहेबांची पुढची पिढी डॉ.विजय बिडकर यांच्या पत्नी विद्यमान अध्यक्षा हेमलताताई बिडकर यांनी संपूर्ण जीवन आदिवासी भागातील जनतेच्या वैद्यकीय,सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी वाहून घेतलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED LATEST NEWS

Follow us