इगतपुरी :- इगतपुरी तालुक्यातील धार्णोलीची योगेश वर झालेल्या बिबट्याच्या हल्ल्याची घटना ताजी असतानच, आज पहाटे चार पाच वाजेच्या सुमारास त्रिंगलवाडी जवळील निशाण वाडी येथील 31 वर्षीय तरुणीवर बिबट्याने हल्ला केला. यात या दुर्देवी मुलीचा मृत्यू झाला, मीनाक्षी शिवराम झुगरे( वय 31 वर्ष) असे ठार झालेल्या मुलीचे नाव आहे.
सदर गाव आदिवासी भागातील असल्याने सकाळी बाहेर पडलेल्या या मुलीवर दबा धरून असलेल्या बिबट्याने प्राण घातक हल्ला केला. यात तिचा मृत्यू झाला .
या घटनेची माहिती कळताच प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या समवेत कर्मचारी यांनी घटना स्थळी धाव घेतली. ह्या भागासह बिबट्याची वावर असलेल्या तालुक्यातील भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा. त्याच प्रमाणे पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी स्थानिक गावकऱ्यांनी केली. दरम्यान वनविभागाकडून घटनेची तत्काळ दखल घेण्यात आली असून ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत.लवकरच बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी हालचाली करण्यात आल्या आहेत