Follow us

नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंसमोर अंगणवाडी सेविकांचा गोंधळ…

नाशिक :  राष्ट्रीय युवा महोत्सवाचा मान यंदा नाशिकला मिळाला आहे. 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तपोवन येथील मैदानावर महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यानिमित्त तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी नाशिकमध्ये दाखल झाले. नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी गोंधळ केल्याची घटना घडली आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच अंगणवाडी सेविकांना टाहो फोडला. मात्र पोलिसांनी अंगणवाडी सेविकांना मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यास मज्जाव केला. त्यामुळे काही महिला सुरक्षेच कड तोडून मुख्यमंत्र्यांच्या जवळ गेल्या. यावेळी पोलिसांना महिलांना ताब्यात घेतले. काही वेळाने त्या महिलांना सोडून देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED LATEST NEWS

Follow us