Follow us

उद्या होणार ‘XPoSat’ मोहिमेचं प्रक्षेपण; इस्रो वैज्ञानिक

ISRO :- नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रो आपली महत्त्वाकांक्षी ‘एक्सपोसॅट’ मोहीम लाँच करणार आहे. या पार्श्वभूमीवर इस्रोच्या वैज्ञानिकांनी आज तिरुमला श्री वेंकटेश्वरा मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. याप्रसंगी अमित कुमार पात्रा, व्हिक्टर जोसेफ, यशोदा आणि श्रीनिवास हे वैज्ञानिक उपस्थित होते.

उद्या, म्हणजेच 1 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी XPoSat या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून इस्रो अंतराळातील कृष्णविवरे आणि 50 सर्वात मोठ्या प्रकाशस्त्रोतांचा अभ्यास करणार आहे.

एक्सपोसॅट उपग्रह हा पृथ्वीच्या 500 ते 700 किलोमीटरच्या कक्षेत फिरत राहणार आहे. पुढील कमीत कमी पाच वर्षे तो डेटा गोळा करून इस्रोला देत राहील.

आदित्य एल-1

दरम्यान, इस्रोची Aditya L1 मोहीम देखील अंतिम टप्प्यात आली आहे. सहा जानेवारी रोजी आदित्य उपग्रह हा एल-1 पॉइंटवर पोहोचणार आहे. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी ही माहिती दिली आहे. ही भारताची पहिलीच सौरमोहीम आहे. आदित्य हा उपग्रह या लॅग्रेंज पॉइंटवरुन 24×7 सूर्याचा अभ्यास करू शकणार आहे. आदित्यवरील विविध उपकरणांनी

2023 सालात इस्रोने कित्येक मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या. चांद्रयान-3 मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करून रोव्हर चालवणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला. आता 2024 मध्ये देखील इस्रो कित्येक मोहिमा राबवणार आहे. एकूणच, भारतीय अंतराळ संशोधनासाठी पुढचं वर्षही महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED LATEST NEWS

Follow us