Follow us

Good bye 2023 : गुगलने वर्षाच्या शेवटच्या दिवशी बनवले खास डूडल, असा दिला 2023 ला निरोप

सर्च इंजिन गुगल त्याच्या अप्रतिम कलाकृतींसाठी प्रसिद्ध आहे. जगभर जेव्हा जेव्हा एखादी मोठी घटना घडते किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाच्या स्मरणाचा प्रसंग येतो, तेव्हा गुगल ते अनोख्या पद्धतीने साजरे करते.

आज 2023 वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि तो साजरा करण्यात गुगलही मागे राहणार नाही. गुगलनेही डूडल बनवून हा दिवस अतिशय मजेशीर पद्धतीने साजरा केला आहे. आज ३१ डिसेंबर रोजी गुगलने एक अनोखे डूडल बनवले आहे. त्याला New Year’s Eve 2023 असे नाव देण्यात आले आहे.

आज वर्षाचा शेवटचा दिवस

वर्षाच्या शेवटच्या डूडलमध्ये तुम्हाला 2023 हे गुगलच्या अगदी वर लिहिलेले दिसेल. यामध्ये ओ अक्षराच्या जागी स्माईली इमोजी लावण्यात आले आहे. याशिवाय संपूर्ण डूडलला सेलिब्रेशन लूक देण्यात आला आहे. बघून असं वाटतं की हा 2023 वर्षाचा शेवटचा दिवस असणार आहे.

याशिवाय, जेव्हा तुम्ही डूडलवर क्लिक करता आणि पुढे जाता, तेव्हा वरच्या बाजूला New Year’s Eve असे लिहिलेले दिसते. नववर्षाचे स्वागत करणारे अनेक फोटोही पाहायला मिळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED LATEST NEWS

Follow us