Follow us

कसबे सुकेणेत तब्बल तासभर बिबट्यांचा थरार

नाशिक :- कसबे सुकेणे ते वडाळी रस्त्यावरील गंगापूर कॅनॉलजवळ कैलास निर्भवणे यांचा शेळ्या मेंढ्यांच्या फार्ममध्ये मंगळवारी (ता. १२) रात्री अडीचच्या सुमारास दोन बिबट्यांनी तब्बल नऊ शेळ्या फस्त केल्या. तब्बल एक तास हा थरार सुरू होता. यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे
कैलास निर्भवणे यांच्या पोल्ट्रीमध्ये दोन बिबट्यांनी तुटलेल्या पत्र्यामधून शिरकाव करून नऊ शेळ्यांना फस्त केले. हा सर्व थरार कैलास निर्भवणे व कुटुंबाने डोळ्यांनी बघितला. वन विभागाने बिबट्याचा लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी कसबे सुकेणे परिसरातून होत आहे. कैलास निर्भवणे ड्रायव्हर म्हणून काम करतात. त्यांना मुलगा व मुलीचे लग्न करायचे होते. शेळ्या, मेंढ्या आणि कोंबड्यांवर त्यांचा आर्थिक प्रपंच सुरू होता. उदरनिर्वाहाचे साधन बिबट्यांनी फस्त केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED LATEST NEWS

Follow us