नाशिक :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे व मनसे नेते तथा मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना प्रदेश सरचिटणीस अरिफभाई शेख यांच्या आदेशाने विश्वास बाळासाहेब तांबे यांची महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षापदी निवड करण्यात आली आहे.
सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना प्रदेश सरचिटणीस अरिफभाई शेख यांच्या वतीने विश्वास बाळासाहेब तांबे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.याप्रसंगी मनसे प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे,जिल्हाध्यक्ष अंकुश पवार,शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे,म्युनिसिपल कामगगार सेना अध्यक्ष सलीम मामा शेख उपस्थित होते. सर्व नेत्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.