Follow us

तब्बल २७ वर्षांनंतर माजी विध्यार्थ्यांची भरली शाळा.. 

इगतपुरी :- जनता विद्यालय अस्वली माध्यमिक विद्यालयातील सन १९९५-१९९६ या शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून तब्बल सत्तावीस वर्षांनंतर एकत्र येत अस्वली येथील जनता विद्यालय येथे मोठया उत्साहात स्नेहसंमेलन साजरे केले. यात राजकिय क्षेञातील,उच्च पदस्थ, उच्चशिक्षाविभूषित,क्लास वन अधिकारी, खाजगी कंपनीत उच्च पदावर असलेले,कर्मचारी व इतर क्षेत्रात कार्यरत असलेले जवळपास ५० माजी विध्यार्थ्यांचा माजी शिक्षकांसह पुन्हा एकदा वर्ग भरला होता. विद्यालयातील वर्गमित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा देत,रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून मनमोकळ्या गप्पा मारल्या, सुख दुःखाच्या वाटेवर भावनाविवश होत काही मित्रांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.बिरारी सर होते. तर श्री.ए.एस.पवार,श्री.बच्छाव, श्री.तुंगार,श्री.मते,श्री.कानडे,श्री. उघडे तसेच हे मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीस दिवंगत, तानाजी तांबे, तुकाराम गायकर, पुष्पा धोंगडे, प्रकाष बोराडे तसेच माजी शिक्षक कै.चंद्रकांत रूपवते,आदींना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर सर्वांनी पुनश्च एकदा परिचय करून देत मनोगत व्यक्त केले.यानंतर आशा महाले, बनाजी गुळवे या विद्यार्थ्यांनी नोकरीच्या निमित्ताने बाहेर इतर शहरात असलेल्या वर्गमित्रांचे मोबाईल नंबर मिळवून त्यांना व्हाट्सएप,फेसबुक सारख्या सोशल मिडियाच्या माध्यमातून एकत्र आणले.त्यानंतर सुट्टीच्या दिवशी वेळ काढून सर्व वर्गमित्रांनी एकत्र यायचे ठरवले, सत्तावीस  वर्षांनंतर एकत्र जमलेल्या सर्व वर्गमित्रांच्या मनसोक्त गप्पा रंगल्या,जुन्या आठवणींमध्ये दिवस कसा गेला कळाले सुद्धा नाही.सर्वांनी एकत्र स्नेह भोजन करीत पुन्हा एकदा भेटण्याचे एकमेकांना आश्वासन देत सर्वांनी भरल्या हृदयाने निरोप घेतला.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेला भेटवस्तू देण्या आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.डी.धोंगडे यांनी केले तर शेवटी आभार कार्यक्रमाचे नियोजक बनाजी गुळवे यांनी मानले. यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी बेलगाव कुऱ्हे चे सरपंच नंदराज गुळवे, तसेच असंख्य विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.

आजचा स्नेहमेळावा पाहून मन भरून आले.आमचे विद्यार्थी एवढ्या मोठ्या पदांवर कार्यरत असल्याचे प्रत्यक्ष समजल्यानंतर खरंच कंठ दाटून आला असून या विद्यार्थ्यांचा खुपच अभिमान वाटतो तसेच यामुळे आमचे देखील नाव उज्ज्वल झाल्याचे समाधान मिळाले.-. ए.एस. पवार.(माजी शिक्षक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED LATEST NEWS

Follow us