लासलगाव :- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवाळीच्या तब्बल 12 दिवसाच्या सुट्टीनंतर सोमवार, दिनांक 20 नोव्हेंबरपासून कांदा लिलावास सुरुवात झाली. यावेळी उन्हाळ कांद्याला कमाल 4545 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला तर, लाल कांद्याला 4101 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. दिनांक 6 नोव्हेंबरला लासलगाव बाजार समितीत लिलाव झाले असताना उन्हाळ कांद्याला कमाल 4 हजार रुपये, तर लाल कांद्याला कमाल 3 हजार 501 रुपये क्विंटल, असा भाव मिळाला होता. 6 नोव्हेंबरच्या तुलनेत कांदा कमाल दरात 500 ते 600 रुपयांची तेजी दिसून आली.
नाशिक जिल्ह्यातील विंचूर उपबाजार वगळता सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांना ऐन दीपोत्सवात कांदा विक्रीसाठी अडचण झाली होती. परंतू आता कांदा लिलाव पूर्ववत झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.