Follow us

Paytm वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी, 29 फेब्रुवारीनंतर बँकिंग सुविधा बंद… ग्राहकांचं काय होणार?

नवी दिल्ली- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने Paytm पेमेंट बँक लिमिटेड Paytm Payments Bank Limited (PPBL) ला ग्राहकांच्या खात्यासंबंधी व्यवहारावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे बँकेच्या वॉलेट आणि फास्टॅगमधून देखील व्यवहार बंद होणार आहेत. आरबीआयच्या आदेशानुसार २९ फेब्रुवारीपासून हे आदेश लागू होतील. कंपनीला आता नवे ग्राहक जोडता येणार नाहीत.

आरबीआयने Paytm पेमेंट बँक लिमिटेडला यापुढे ग्राहकांकडून कोणतीरी रक्कम न स्वीकारण्याच्या सूचना दिल्या आहेत. बँकेच्या कामकाजामध्ये अनियमितता आढळून आली होती. त्यानंतर आरबीआयने हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने सांगितलं की, PPBL ला आता नवे ग्राहक न जोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडला ग्राहक खाते, वॉलेट आणि फास्टॅग मध्ये जमा असलेले किंवा टॉप-अप रक्कम स्वीकारण्यास बंदी आणण्यात आली आहे. आरबीआयने सांगितलंय की, एका व्यापक सिस्टम रिपोर्टनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय बँकेने बँकिग अधिनियम, १९४९ च्या कलम ३५ ए च्या अधिकारांचा वापर करत ही कारवाई केली आहे.

आरबीआयने काय म्हटलंय?

ग्राहक खाते, प्रिपेड, वॉलेट, फास्टॅग, एनसीएमसी कार्ड इत्यादी सेवांमध्ये २९ फेब्रुवारी २०२४ नंतर होणाऱ्या कोणत्याही व्यवहारांवर बंदी असेल. मात्र, व्याज, परतावा इत्यादी राशी जमा करता येईल. खाते, वॉलेट, फास्टॅग यामध्ये सध्या उपलब्ध असलेल्या पैशांचा वापर करता येईल. मात्र, यापुढे पैस यामध्ये टाकता येणार नाहीत. २०२२ मध्येच नवे ग्राहक न जोडण्याचे आरबीआयने आदेश दिले होते.

आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी पेटीएमचे शेअर थंडावल्या अवस्थेत होते. मार्केटमध्ये शेअरच्या किंमतीमध्ये घट होऊन ७६१ रुपये झाली. २० ऑक्टोंबर २०२३ मध्ये शेअरची किंमत ९८९.३० सर्वोच्च पातळीला पोहोचली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED LATEST NEWS

Follow us