Follow us

वेगवेगळ्या ठिकाणाहून कारसह साडेपाच लाखाचा गुटखा जप्त

मालेगाव : शहर व परिसरात जिल्हा पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांचे विशेष पथक, तालुका पोलिस व शहर पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून कारसह साडेपाच लाखाचा गुटखा जप्त केला.

याप्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. मालेगाव-कुसुंबा रस्त्यावरील डोंगराळे शिवारात कैलास जिरे (५३, रा. इंदिरानगर, कुसुंबा) व त्याचा सहकारी संजय शिंदे (५५, रा. गल्ली नं. २, कुसुंबा, जि. धुळे) हे दोघे संशयित महिंद्रा लोगन कारमधून (एमएच १९ एएक्स ७८१७) गुटखा बंदी असताना पानमसाला, गुटखा व सुगंधित तंबाखू अवैधरीत्या वाहतूक करताना मिळून आले.

श्री. उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक पाटील, पोलिस शिपाई विजय वाघ व सहकाऱ्यांनी सापळा रचून संशयावरून ही कार जप्त केली.

गाडीतून पथकाने दोन लाख २७ हजार ७६२ रुपये किंमतीचा गुटखा मिळून आला. तीन लाखाच्या कारसह पोलिसांनी पाच लाख २७ हजार ७६२ रुपयांचा ऐवज जप्त केला.

याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली असून संशयितांना अटक करण्यात आली आहे.

विशेष पथकातील पोलिस शिपाई दीपक पवार व सहकाऱ्यांनी दाभाडी शिवारातील पाच डिव्हिजनमध्ये दुसरी कारवाई केली. या पथकाने दोस्ती पान स्टॉलवर छापा टाकून ३ हजार ४० रुपये किमतीचा पान मसालासह विविध कंपनीचा ३ हजार ४० रुपयांचा गुटखा जप्त केला.

या प्रकरणी पान स्टॉल चालक राजू पिंजारी (२८, रा. दाभाडी) याला अटक करण्यात आली आहे. शहर पोलिसांनी निहालनगर भागात मदिना चौकातील पान स्टॉलवर छापा टाकला.

येथील पान स्टॉल मालक सुलतान सलीम खान (वय २४, रा. निहालनगर) याच्या पान दुकानातून १ हजार २१८ रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. पोलिस शिपाई मनोज चव्हाण व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. सुलतान खानला अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED LATEST NEWS

Follow us