Follow us

 जिल्ह्यात दोन लाखांचा जीवघेणा नायलॉन मांजा जप्त

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये नायलॉन मांजा विक्री व वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच विक्री करणाऱ्यावर तडीपारीची कारवाईदेखील सुरू आहे.

असे असतानाही शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून १ लाख ७२ हजारांचा २१५ नायलॉन मांजाचे गट्टू जप्त केले आहेत.

याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अधिसूचना जारी करीत शहर आयुक्तालय हद्दीमध्ये नायलॉन मांजा विक्री व वापरावर बंदी घातलेली आहे. तसेच, आत्तापर्यंत केलेल्या कारवाईतील ४२ जणांना वीस दिवसांसाठी तडीपारही करण्यात आले आहे.

असे असतानाही, शहरात चोरीछुप्यारितीने नायलॉन मांजाची विक्री सुरू आहे. युनिट एकचे अंमलदार नितीन जगताप, विलास चारोस्कर यांना मुंबई नाका परिसरामध्ये नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी संशयित येणार असल्याची खबर मिळाली होती.

त्यानुसार, पोलिसांनी बजाज शोरुमच्या पाठीमागे असलेल्या हरिविहार सोसायटीजवळ असलेल्या चहाच्या टपरी येथे आलेल्या संशयित अरबाज फिरोज शेख (२४, रा. भद्रकाली, जुने नाशिक) यास अटक केली. त्याच्याकडून १ लाख ७२ हजार रुपयांचे नायलॉन मांजाचे २१५ गट्टू जप्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED LATEST NEWS

Follow us