Follow us

जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी; नाशकात शिवसेना शिंदे गट आक्रमक

नाशिक :- शिर्डीत पक्षाच्या शिबिरात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचे वक्तव्य केले. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर नाशिकमध्ये साधू महंतांनी पोलीस ठाणे गाठत आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यापाठोपाठ आता शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जितेंद्र आव्हाडांविरोधात नाशिकच्या शिंदे गटाच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आले. तसेच आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देण्यात आली आहे.

राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. नाशिकमध्ये हिंदू धर्मीय एकवटले असून त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर शिवसेना शिंदे गट आक्रमक झाल्याचे दिसून आले.

शिवसैनिक काय करतील, हे सांगण्याची गरज नाही
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते म्हणाले की, प्रभू श्रीराम आणि नाशिकचे एक वेगळे नाते आहे. प्रभू श्रीरामाच्या आगमनाची संपूर्ण देश वाट बघत आहे. धार्मिक वातावरण संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. असे असताना देखील धार्मिक तेढ निर्माण करायची. मतांचे राजकारण ज्यांच्या डोक्यात आहे त्या जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आंदोलन करण्यात आले. हे केवळ प्रतिकात्मक आंदोलन आहे. अशाच पद्धतीचे वक्तव्य जर आव्हाड करणार असतील तर शिवसैनिक काय करतील, हे त्यांना सांगण्याची गरज नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED LATEST NEWS

Follow us