Follow us

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंमुळेच महिलांच्या पंखांना बळ : पोलीस आयुक्त संदीप कर्णिक

नाशिक : आजच्या आधुनिक युगामध्ये विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच समाजातील महिलांच्या पंखांना बळ मिळाले आहे. त्यांचे योगदान अमूल्य असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले. 

गंगापूर रोडवरील पोलीस आयुक्तालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित विविध क्षेत्रातील महिलांच्या गौरव सोहळ्याप्रसंगी आयुक्त कर्णिक बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, प्रिया कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी शहरातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या महिलांचा उपस्थित महिलांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच त्यांच्या कार्याचा गौरवही करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी चित्तोडकर यांनी केले तर आभार उपायुक्त मोनिका राऊत यांनी मानले.

महिला पोलीस कर्मचारी सन्मानित

यावेळी शहर पोलीस आयुक्तालयातील विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचार्यांनाही गौरविण्यात आले. यात दामिनी पथक, निर्भया पथक, भरोसा सेल, सीसीटीएनएस, वेल्फेअर विभागासह पोलीस ठाण्यांमध्ये असलेल्या अंमलदार महिला कर्मचार्यांचा समावेश होता.

यांचा झाला गौरव

प्रा. डॉ. निता गांगुर्डे, प्रा. डॉ. शाहिस्ता इनामदार, शोभा पवार, ॲड. पल्लवी घुले-टिळे, ॲड पौर्णिमा नाईक, मानसोपचार तज्ञ पूजा प्रसून, रुचिता ठाकूर, पल्लवी कुलकर्णी, अश्विनी न्याहारकर, डॉ. तेजू सोलोमन, डॉ. संध्या गडाख, मंदा कचरे, भारती पवार, प्रिती जगताप, पूजा खैरनार, सुनीता पाटील, अंकिता मोरे, दीक्षा सोनवणे, वैशाली भट, चारुशिला कुलकर्णी, सुनिता चव्हाण, प्रज्ञा सदावर्ते, डॉ. सुखदा ठाकरे, मोहिनी पवार, जुली सातभाई, रुचा गोखले, अमृता गुंजाळ, मिनल मोहगावकर, सारिका पिचाज, एडना फर्नांडिस, साक्षी संगमनेरकर, मीनल चौधरी, मंजुषा उपासनी, स्वाती भावसार, अर्चना कोठावदे, प्रा. मीनाक्षी गवळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED LATEST NEWS

Follow us