Follow us

चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन; 78व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डे यांचं आज वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झालंय. रविंद्र बेर्डे यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. रविंद्र हे लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ होते. अशातच रविंद्र यांचा पुतण्या म्हणजेच अभिनेता अभिनय बेर्डेने काका रविंद्र यांचा फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

रविंद्र बेर्डे यांचे चित्रपट
अशोक सराफ, विजय चव्हाण, महेश कोठारे, विजू खोटे, सुधीर जोशी आणि भरत जाधव यांच्यासोबत रवींद्र बेर्डे यांची जोडीला पडद्यावर खूप प्रेम मिळालं होतं. अनेक प्रकारच्या पात्रांनी त्यांनी लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले.

रवींद्र मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय होते. सिंघम, चिंगी यांसारख्या हिंदी चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. 1995 मध्ये नाटकाच्या रंगमंचावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर 2011 साली त्यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रासले.
रविंद्र बेर्डे यांचा एक फोटो अभिनयने शेअर केलाय. यात अभिनय आणि स्वानंदी दिसत असुन त्यांनी काकांच्या खांद्यावर हात ठेवलाय. रविंद्र यांनी सुद्धा फोटोसाठी स्माईल दिलेली दिसत असुन ते काहीसे आजारी दिसत आहेत. हा फोटो शेअर करुन अभिनयने काकांना श्रद्धांजली वाहिली आहे.

रविंद्र बेर्डे यांच्या निधनाने शोककळा
रविंद्र गेले अनेक दिवस त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरु होते. पुढे उपचार घेऊन घरी आल्यानंतर त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी 1965 मध्ये रंगभूमीवर पदार्पण केलं.

300 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रवींद्र बेर्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED LATEST NEWS

Follow us