Follow us

राज्यात पोलिस प्रशिक्षणार्थींची वाढणार क्षमता…

लातूर : राज्यात पोलिस भरतीमध्ये येणाऱ्या नवनियुक्त पोलिसांना राज्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात वेळेत प्रशिक्षण देता यावे या करिता राज्यात दहा पोलिस प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहेत. या प्रशिक्षण केंद्राची क्षमता आठ हजार चारशे इतकी आहे.
आता त्यात पाच हजाराने वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात अडीच हजार व दुसऱ्या टप्प्यात अडीच हजार अशी क्षमता वाढवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस दलात नव्याने भरती झालेल्या पोलिस शिपाई व चालक पोलिस शिपाई यांना मूलभूत प्रशिक्षण तसेच पोलिस अंमलदार यांना सेवांतर्गत प्रशिक्षण देण्याकरिता एकूण १० पोलिस प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहेत.

सदर १० प्रशिक्षण केंद्राची एकूण क्षमता आठ हजार ४०० इतकी आहे. महाराष्ट्र पोलिस दलात नव्याने भरती झालेल्या पोलिस शिपाई व चालक पोलिस शिपाई यांना पूर्ण संख्येने दोन सत्रामध्ये मूलभूत प्रशिक्षण पूर्ण करण्यास दीड वर्ष इतका कालावधी लागतो. भरती प्रक्रियेकरीता अंदाजे ६ महिने असा मिळून एकूण २ वर्षाचा कालावधी लागतो. या २ वर्षाच्या कालावधीमध्ये पोलिस शिपाई व चालक पोलिस शिपाई संवर्गाची नव्याने १२ ते १५ हजार इतकी पदे रिक्त होतात. त्यानुषंगाने, पुन्हा मोठया संख्येने भरती प्रक्रिया पार पाडली जाते. त्यांनाही प्रशिक्षण द्यावे लागते.

सद्यःस्थितीत २०२३ मध्ये राज्य पोलिस दलात नव्याने भरती झालेल्या पोलिस शिपाई व चालक पोलिस शिपाई यांचे सर्व पोलिस प्रशिक्षण केंद्रात पूर्ण क्षमतेने मूलभूत प्रशिक्षण सुरु आहे. पोलिस अंमलदाराच्या सेवांतर्गत प्रशिक्षणामध्ये जून, २०२३ पासून खंड पडला आहे. सदरचे सेवांतर्गत प्रशिक्षण हे अत्यंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED LATEST NEWS

Follow us