नाशिक :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. भारतरत्न भीमराव रामजी तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे बहुआयामी व्यक्तिमत्वाचे स्वामी होते.
न्यायशास्त्रज्ञ,अर्थशास्त्रज्ञ, प्रखर समाज सुधारक असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अश्पृश्यता,जाती व्यवस्था सारख्या सामाजिक कुप्रथांविरुद्ध आपल्या लेखणी व वक्तृत्वातून मोठी जन जागृती घडवून आणली. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री,भारतीय राज्यघटनेचे जनक,भारतीय प्रजासत्ताकाच्या शिल्पकारांपैकी एक होते असे प्रतिपादन या प्रसंगी मनसे प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम,प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नामदेव पाटील,नाशिक शहर उपाध्यक्ष संतोष कोरडे,विभाग अध्यक्ष भाऊसाहेब निमसे,अमित गांगुर्डे, मिलिंद कांबळे,रोहन जगताप, निकितेश धाकराव,निलेश शहाणे, अविनाश पाटील,नितीन आहिरराव,कामिनी दोंदे,ज्योती शिंदे,भानुमती अहिरे,अरुणा पाटील,शशिकांत चौधरी,नितीन दानापुणे,रोहन देशपांडे,मनोज सोनवणे,गणेश झोमन,विशाल भावले,पदाधिकारी उपस्थित होते.