Follow us

उत्तराखंड :-    उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे कोसळलेल्या सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. १७ दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या कामगारांना आज म्हणजेच मंगळवारी बाहेर काढण्यात येणार आहे. एनडीएमएने ही माहिती दिली आहे. कामगारांना बाहेर काढण्यासाठी ३ ते ४ तास लागतील असे त्यांनी सांगितले. बचाव कार्यादरम्यान बोगद्याजवळ रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत.
उत्तरकाशी येथे बोगद्यात अडकलेले ४१ कामगार तीन ते चार तासांत बाहेर पडतील, असे एनडीएमएचे सदस्य लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांनी सांगितले. आम्ही यशाच्या जवळ आहे. मॅन्युअल काम चालू आहे आणि आम्ही ५८ मीटरपर्यंत पोहोचलो आहोत. तज्ञ आणि लष्कराचे अभियंते यशस्वी झाले आहेत. ते ५८ मीटरपर्यंत नेऊन ऑगर मशीनच्या साहाय्याने पाईप पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती एनडीएमए सदस्यांनी दिली.

"Will take 3-4 hrs to evacuate workers from Silkyara tunnel…": NDMA official Ata Hasnain

Read @ANI Story | https://t.co/dRdIv24VGX#UttarakhandTunnel #UttarkashiRescue #Uttarkashi #NDMA pic.twitter.com/NbvhU0yJxS
— ANI Digital (@ani_digital) November 28, 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED LATEST NEWS

Follow us