Follow us

कॅशबॅक देणार नाही तर पैसे घेणार; मोबाइल रिचार्जवर शुल्क आकारण्यास Google Pay नं केली सुरुवात

भारतातील Google Pay वापरकर्त्यांसाठी एक वाईट बातमी आहे. गुगल पे मोबाईल रिचार्जसाठी वेगळे पैसे आकारणार असल्याची बातमी आहे. अनेक वापरकर्त्यांनी दावा केला आहे की त्यांनी Google Pay वर सुविधा शुल्काच्या नावाखाली पैसे घेणे सुरू केले आहे.आतापर्यंत गुगल पेद्वारे मोबाईल रिचार्ज करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त पैसे द्यावे लागत नव्हते, परंतु आता तुम्हाला ते द्यावे लागणार आहेत.गुगलने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, मात्र अनेक सोशल मीडिया यूजर्सने हा दावा केला आहे. PhonePe आणि Paytm या कंपन्या मोबाइल रिचार्जसाठी अतिरिक्त शुल्क आकारत आहेत.
जेव्हा या कंपन्यांनी रिचार्जसाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यास सुरुवात केली तेव्हा Google ने सांगितले होते की त्यांच्या Google Pay वर मोबाइल रिचार्जवर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकरले जाणार नाही. मुकुल शर्मा यांनी ट्विटरवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे ज्यामध्ये Jio च्या 749 रुपयांच्या रिचार्जसाठी, Google Pay 752 रुपये आकारत आहे.
ज्यामध्ये सुविधा शुल्क म्हणून 3 रुपये जोडले आहेत. हे सुविधा शुल्क अॅपद्वारे UPI आणि कार्ड पेमेंट मोडमध्ये भरावे लागेल.रिपोर्टनुसार, 100 रुपये किंवा त्यापेक्षा कमी रिचार्जसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नाही. 200-300 रुपयांपर्यंतच्या रिचार्जसाठी 2 रुपये आणि त्यापेक्षा जास्त रिचार्जसाठी 3 रुपयांचे शुल्क भरावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED LATEST NEWS

Follow us